महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची विदर्भिय बैठक संपन्न


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

हिंगणघाट : आज महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची विदर्भिय बैठक नागपूर येथे घेण्यात आली. नागपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली. नागपूर चा दोन दिवसीय दौरा मंगलाताई ठक जेष्ठ नागरिक निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समिती च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा यांनी फिरून केला. 

या वेळी नागपूर मधील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेगळ्या परिसरातील अनेक महीला सहभागी झाल्या व मंगला ताईंनी महिलांना विदर्भाचे व नागपूर शहराचे पदभार सोपविले. संघटनेच्या नागपूर शहरा अध्यक्ष पदी सुनिता ताई इंगळे, उपाध्यक्ष पदी सारिकाताई मुलकलवार, तर सचिव पदी उज्वलाताई रोडगे यांना पदभार सोपविण्यात आला. विदर्भ नागपूर विभागाच्या समन्वयक पदी राजश्री दुब्बावार यांची नियुक्ती करण्यात आली, या वेळी सपना मुंगसे, अश्विनी मुंगसे, वनिता वाघुलकर उपस्थित होत्या. सर्वांनी मंगला ताईंचे आभार मानले.

निराधार संघटनेचे कार्य वाढविण्यासाठी व तळागळतील गोरगरीब जनतेस ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या माध्यमातून योजनांचा लाभ जाणते पर्यंत पोहचविण्यासाठी मदत व्हावी व महीला प्रत्येक क्षेत्रात अजूनच मजबूत व्हाव्या यासाठी आपली संघटना महाराष्ट्र भर फिरून संघटना बांधणीचे कार्य करीत आहे. आपण या पदाचा सत्कार्य व समाजपयोगी कार्य करावे अशी पदाधिकाऱ्यांना मंगला ताई यांनी सांगितले तसेच  "पाठभार जखमा" एक सत्य कथन मंगला ताईंनी लिहिलेले पुस्तकं महिलांना वाणाच्या स्वरूपात देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची विदर्भिय बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची विदर्भिय बैठक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on January 23, 2022 Rating: 5
Powered by Blogger.