वणी गणेशपूर मार्गावर बियरबार व देशी दारू दुकानाला परवानगी देऊ नये - रहिवाशांनी केली मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी गणेशपूर मार्गावर बियरबार व देशी दारूचे दुकान सुरु करण्याला परवानगी न देण्याची मागणी कोंडावार ले-आऊट, वासेकर ले-आऊट व गणेशपूर रोड परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकारी तथा दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

वणी गणेशपूर मार्गावर ३००० चौरस फूट जागा खरेदी करून त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम बियरबार व देशी दारू दुकान लावण्याकरिता करण्यात आले असल्याचे समजते. बियरबार व देशी दुकान लावण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून दुकान मालकाने या परिसराशी संबंधित नसणाऱ्या नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन नगर पालिकेकडे प्रस्ताव सादर केल्याचे समजते. नगर पालिकेनेही कोणतीही शहानिशा न करता बियरबार व देशी दारू दुकान सुरु करण्याला परवानगी दिल्याचे समजते. आधीच वणी शहर व तालुक्यात असंख्य दारू दुकाने व बियरबार आहेत. मग नागरिकांची वस्ती असलेल्या ठिकाणी आणखी बियरबार व देशी दारूचे दुकान सुरु करण्याला परवानगी देऊन नगर पालिकेने परिसरात व्यसनाला चालना देण्याचे काम सुरू केले आहे. या बांधकाम परवानगीची चौकशी करून याठिकाणी बियरबार व दारू दुकान लावण्याकरिता देण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करून येथे नव्याने बियरबार व देशी दारू दुकान सुरु करण्याला परवानगी न देण्याची मागणी कोंडावार ले-आऊट, वासेकर ले-आऊट व गणेशपूर रोड परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी व उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

या निवेदनावर उमन टेंभूर्णे, मंगला परचाके, छाया निब्रड, काजल पोटे, पृथ्वी दुधे, नंदा उपरे, ममता मेंगवार, शालू पाते, रंजना मुळे, अर्चना शेंडे, वर्षा शेंडे, सुगंध आवारी, सुनीता आवारी, सारिका आवारी, सोनाली कुईटे, माधुरी वरारकर, सुचिता वरारकर, जयश्री आयटवार, गीता भोंगळे, मेघा पुराणकर यांच्यासह ६६ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वणी गणेशपूर मार्गावर बियरबार व देशी दारू दुकानाला परवानगी देऊ नये - रहिवाशांनी केली मागणी वणी गणेशपूर मार्गावर बियरबार व देशी दारू दुकानाला परवानगी देऊ नये -  रहिवाशांनी केली मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.