गटविकास अधिकारीच कार्यालयात विना माक्स वावरतात तेंव्हा ...?

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : यवतमाळ जिल्ह्यासह वणी तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे शासन व प्रशासन चिंतेत आले असतांनाच कोरोनाचा प्रसार रोखण्याकरिता शासनाने कोरोना विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने कोरोनाचे नियम पाळण्याची सक्ती करतांनाच विना माक्स शहरात फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूलने सुरु केले आहे. महसूल विभाग व नगर पालिकेने विना माक्स शहरात फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाहीची मोहीम उघडली आहे. चोकाचौकात फिरते पथक पाठवून तोंडावर माक्स न लावणाऱ्या नागरिकांकडून सक्तीने दंड वसूल केल्या जात आहे. शासकीय व प्रशासकीय कार्यालयांमध्येही माक्स नाही तर प्रवेश नाही, असे सूचना फलक लावण्यात आले आहे. कार्यालयांमध्ये कामकाजा करिता येणाऱ्या नागरिकांना नियमानुसार तोंडावर माक्स लावणे बंधनकारक करण्यात आले असतांनाच प्रशासकीय अधिकारी मात्र नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहे. जबाबदार अधिकारीच तोंडावर माक्स न लावता कार्यालयात वावरत आहे. ज्या अधिकाऱ्यांवर कोरोनाचे नियम पालन करवून घेण्याची जबाबदारी आहे, ते अधिकारीच कोरोनाचे नियम पायदळी तुडवू लागले आहेत. मग कार्यालयात इतर सर्वांनी माक्स लावून जायचे व अधिकाऱ्यांनी माक्स न लावताच कार्यालयात वावरायचे, हा नवीन नियम आहे की, अधिकाऱ्यांना माक्स लावणे बंधनकारक नाही, हा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. कर्तव्यदक्ष अधिकारीच कर्तव्यात कसूर करू लागल्याने नागरिकांवर सक्ती करणे हा दुजाभाव नाही का, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. अशा या बेजवाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. 
पंचायत समिती हे ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या निवारणाचे कार्यालय असल्याने याठिकाणी नेहमी नागरिकांची वर्दळ असते. ग्रामपंचायतेचे सरपंच, सचिव ग्रामीण भागातील विकासकामे व समस्या घेऊन गटविकास अधिकाऱ्यांकडे येतात. ग्रामीण भागातील नागरिकही आपल्या समस्या व तक्रारी घेऊन गटविकास अधिकाऱ्यांकडे येत असतात. कंत्राटदारांच्याही गटविकास अधिकाऱ्यांकडे येरझारा सुरूच असतात. असे हे अनेकांच्या संपर्कात येणारे गटविकास अधिकारी कार्यालयात विना माक्स वावरून कोरोनाच्या नियमांनाच आव्हान देत आहे. कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करून ग्रामसचिवांशी थेट संवाद साधत आहे. बीडीओ समोर सर्वच माक्स लावून तर बीडीओ विना माक्स लावून कोरोनाच्या नियमांमधला दुजाभाव पटवून देत आहे. कोरोना विषयक नियमांची सक्ती करणारे अधिकारीच आसक्ती करू लागले तर मग नागरिकांनाच वेठीस धरायचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. नागरिकांकडून दंड वसुली व अधिकाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली, हे आता सर्वांनाच खलु लागले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करून कोरोना संक्रमणाचे कारण बनू पाहणाऱ्या अशा या बेजाबदार अधिकाऱ्यांवर जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. वणी शहर व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण वाढले असून रुग्णसंख्याही तीव्र गतीने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी माक्स लावण्याची सक्ती करण्यात आली असून माक्स न लावणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आता तोंडावर माक्स लावूनच सार्वजनिक ठिकाणी जात असून अधिकारी मात्र याला अपवाद ठरत आहेत.
गटविकास अधिकारीच कार्यालयात विना माक्स वावरतात तेंव्हा ...? गटविकास अधिकारीच कार्यालयात विना माक्स वावरतात तेंव्हा ...? Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.