हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महिला भगिनींना साडया वाटप

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मानीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त,शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर तथा शिवसेना तालुका संघटक वरोरा मनिषभाऊ जेठानी यांच्या नेतृत्वात, आई अंबामाईची महाआरती व महिला भगिनींना साडया भेट देण्यात आल्या.

"स्त्री शक्ती हिच मोठी शक्ती" अशी प्रेरणा मनात बाळगून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निम्मित अनावशक्य खर्च टाळून सामाजिक बांधिलीकी जपत एक छोटासा सामाजिक उपक्रम म्हणून खांजी वॉर्ड, अंबादेवी वॉर्ड येथे शेकडो महिला भगिनींना युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर तथा शिवसेना तालुका संघटक मनिषभाऊ जेठानी यांच्या सहकार्याने साडया भेट देण्यात आल्या.

त्यावेळी उपस्थित म्हणून कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे, प्रमुख पाहुणे शिवसेना चंद्रपूर उपजिल्हा प्रमुख रमेशभाऊ मेश्राम, जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रपूर तथा शहर प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती नंदूभाऊ पढाल, वरोरा शिवसेना शहर प्रमुख संदीपभाऊ मेश्राम, भद्रावती शिवसेना नगरसेवक राजूभाऊ सारंगणधर, शिवसैनिक अमितभाऊ निब्रड, शिवसैनिक बंडूभाऊ खरे, शिवसैनिक आशिषभाऊ बोकडे, शिवसैनिक अनिलभाऊ गाडगे, युवासेना उपजिल्हा प्रमुख आलेख रठे, युवासेना तालुका प्रमुख भूषण बुरेले, युवासेना शहर प्रमुख प्रज्वल जानवे, शिवसेना उपशहर संघटिका अलकाताई पचारे, शिवसेना उपशहर संघटिका जोषनाताई काळे, तसेच सर्व शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका, वॉर्डातील महिला भगिनी, सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन शिवसेना सोशल मीडिया सेल तालुका प्रमुख वरोरा गणेश चिडे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आयोजन युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर तथा शिवसेना तालुका संघटक वरोरा मनिषभाऊ जेठानी यांनी केले.
शिवसेना ही '80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण' करतात तसेच शिवसेना तालुका संघटक मनिषभाऊ जेठानी यांचा वरोरा शहरात सामाजिक उपक्रमा मध्ये नेहमीच सहभाग असतात असे वक्तव्य  शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेशभाऊ मेश्राम यांनी केले.
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महिला भगिनींना साडया वाटप हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महिला भगिनींना साडया वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on January 24, 2022 Rating: 5
Powered by Blogger.