गोवंश जनावरांची तस्करी व गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचे धाडसत्र, शिरपूर व वणी पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतून लगतच्या प्रांतात कत्तली करिता मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी २३ जानेवारीला रात्री पोलिस पथकं तयार करून शिरपूर बसस्थानक, चेंडकापुर फाटा व कायर मार्गावर सापळा रचला. रात्री दरम्यान शिरपूर बसस्थानक येथे २ पिकअप वाहने, चेंडकापुर येथे सात पिकअप वाहने व कायर मार्गावर एक पिकअप वाहन अडविण्यात आले. या आठही मालवाहू वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये गोवंश जनावरे आढळून आली. आठ पिकअप वाहनांमध्ये तब्बल २५ गोवंश जनावरे निर्दयीपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ८ पिकअप वाहने व २५ गोवंश जनावरे असा एकूण ४२ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अनिल देविदास आत्राम (२७) रा. कायर, सचिन महादेव थेरे (३८) रा. कुंड्रा, अमित गजानन पोटे (२१) रा. सुरला, अफनल बेग अफसर बेग (३६) रा. कायर, भोलाराम सुरेश पडोळे (२५) रा. डोर्ली, विश्वजित विलास ताजने (२५) रा. बाबापुर, भरत पिदूरकर (२८) रा. सुरला ता. वरोरा, नितीन राजेंद्र नरोटे (२७) ऐरव्हा ता. जिवती, बालाजी थोरात (२७) रा. डोंगरगाव ता. झरी या नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली. आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वणी शहरातील मोमीनपुरा व रजानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी पोउपनि शिवाजी टिपूर्णे व प्रवीण हिरे यांच्यासह पोलिस पथकाला घेऊन मोनिनपुरा व रजानगर येथे धाड टाकली असता काही ईसम गोमांस विक्री करतांना आढळून आले. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी टाकलेल्या संयुक्तिक धाडीत ३७० किलो गोमांस किंमत ५१ हजार ८०० रुपये एवढा मुद्देमाल जप्त करून मो. नासिर अब्दुल रशीद (५१), मो. अनिस अब्दुल रशीद (४८), मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी, मो. पाशा अब्दुल अजीज कुरेशी (३८), मो. ऐजाज अब्दुल अजीज कुरेशी (४९), अब्दुल वासे अब्दुल वाहिद (२३) सर्व रा. मोमीनपुरा, मो. ईस्तेयाक अब्दुल वहाब कुरेशी रा. रजानगर या सात आरोपींना अटक केली. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर दोन्ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलिप पाटिल भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात वणीचे ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी व शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी आपापल्या पोलिस पथकासह केली.
गोवंश जनावरांची तस्करी व गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांचे धाडसत्र, शिरपूर व वणी पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 24, 2022
Rating:
