सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध गाैण खनिजावर अंकुश व दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे तथा अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी जिल्हाभर महसुल विभागाचे फिरते पथक निर्माण केले असुन, त्याच अनुषंगाने राजु-याचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तथा तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांचे मार्गदर्शनाखाली काेरपना मंडळाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे महसुल विभागाचे पटवारी प्रभाकर कुडमेथे, व काेतवाल नंदु कुडमेथे यांनी रविवार दि.२३ जानेवारीला मध्यरात्री वनाेजा येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या एका ट्रॅक्टरव्दारे रेतीची वाहतुक करतांना रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.
गुप्त माहितीच्या आधारे व स्वताच्या जिवाची पर्वा न करता या महसुल पथकाने ही धडक कारवाई केली रात्रीचा फायदा घेत काही रेती तस्करांनी अवैध रेती नेण्याचा सपाटा काेरपना भागात लावला हाेता. या पथकाने सदरहु ट्रॅक्टरचा रितसर जप्तीनामा करीत त्याच रात्री ते ट्रॅक्टर दंडात्मक कारवाईसाठी काेरपना तहसील कार्यालयात जमा केले असल्याचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी आज प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. जप्तीतील क्टर मालकाचे नाव भारत रामचंद्र रागीट असून अवैध रेतीची वाहतुक वाहन चालक संदीप कुडमेथे हा करीत हाेता. या पूर्वी सुध्दा मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी अवैध गाैण खनिजाच्या बाबतीत धडक कारवाया केल्या आहे.
मध्यरात्री केलेल्या कारवाईमुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
पैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीची अवैध वाहतुक, काेरपना महसुल पथकाने केली जप्तीची कारवाई !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 24, 2022
Rating:
