सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव : आधीच कर्जाच्या खाईत पोहोचलेल्या, ओल्या दुष्काळामुळे उत्पन्नाची साधी अर्धी सरासरीही न ओलांडलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील कृषीपंपांची विजतोडणी विज मंडळाकडून केली जात आहे. ही विजतोडणी त्वरीत थांबवण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
सध्या परिसरातील अनेक शेतकऱ्यांकडे वीजेचे थकीत देयके आहेत. मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्मानी संकट येत आहेत. या संकटांचा सामना करतांना शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहेत. अशातच आता या शेतकऱ्यांच्या शेतातील वीज तोडणी वीज मंडळातर्फे सुरू आहेत. यावर्षी ओल्या दुष्काळामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले. कपाशीचे उत्पन्नही अर्ध्यावर आलेले आहेत. अशातच आता शेतकऱ्यांनी काही भर भरून काढण्यासाठी शेतामध्ये चणा, गहू आणि भाजीपाला यांची लागवड केली आहे. आता हंगाम बहरत असतांना वीज मंडळातर्फे शेतकऱ्यांची विजतोडणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांसमोर एक नवेच संकट समोर उभे ठाकले आहे. जर विजमंडळातर्फे ऐन रब्बी हंगामात विजतोडणी केली तर शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचेसुद्धा नुकसान होऊन शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहेत. त्यामुळे ही विजतोडणी त्वरीत थांबवावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष भारत मत्ते, नगरसेवक हेमंत नरांजे, उपाध्यक्ष दयाल रोगे, शहराध्यक्ष शेख चांद, नागेश रायपुरे, जिजाताई वरारकर, नितीन वाढई, सुरेश महाकुलकर, गजानन रासेकर, अभिजित जुमडे, विवेक मस्की, दशरथ बोढाले, अतुल पचारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कृषी पंपांचे वीज कट करणे त्वरीत बंद करा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला आंदोलना चा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 24, 2022
Rating:
