टॉप बातम्या

भुरट्या चोरांचा धुमाकूळ सुरूच, एसटी डेपो मधिल लोखंडी साहित्य केले लंपास

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : शहर व तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट चांगलाच वाढला असून या भुरट्या चोरांची नजर आता एसटी डेपो मधील लोखंडी साहित्यावर पडली आहे. वणी एसटी डेपोच्या खुल्या वर्कशॉप मधील लोखंडी साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. वर्कशॉप मधिल बसचे लोखंडी स्पेअर पार्ट्स व तांत्रिक दुरुस्तीचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार आगार व्यवस्थापकांनी पोलिस स्टेशनला केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १५ जानेवारी ते २३ जानेवारीच्या रात्री दरम्यान घडली असून २४ जानेवारीला दुपारी १.३३ वाजता पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली आहे.

मागील अडीज महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे डेपोमध्येही सन्नाटा पसरलेला आहे. बहुतांश एसटी बसेस या आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा आता एसटी डेपोकडे वळविला आहे. डेपो मधील बसचे लोखंडी पार्ट्स व बसच्या दुरुस्ती करिता उपयोगात येणारे लोखंडी साहित्य चोरी करण्याचा सपाटाच चोरट्यांनी लावला आहे. एसटी डेपोमध्ये चार सुरक्षा रक्षक तैनात असतांना देखील त्यांच्या डोळ्यात धूळ झोकून चोरटे आपला डाव साधत आहे. चार दिवसांत चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीचे पार्ट्स व ईतर लोखंडी साहित्य लंपास केले आहे. गेअर बॉक्स उतरविण्याकरिता वापरण्यात येणारी घोडी दोन, लोखंडी पट्टी एक, हब ड्रम एक, टायर डिक्स व रिंग तथा लोखंडी वस्तू असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केल्याची तक्रार वणी आगाराचे व्यवस्थापक सुमेध सखाराम टिपले (३९) रा. वासेकर ले-आऊट यांनी पोलिस नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि च्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 

पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोलिस करित आहे.
Previous Post Next Post