सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी घुग्गुस मार्गावरील टोल नाक्याजवळ असलेल्या पंजाब ट्रान्सपोर्ट या कोल वाहतूक कंपनीमध्ये शंभराहून अधिक वाहन चालक कोळसा वाहतूक करणारी वाहने चालवितात. चालकाला वाहन देतांना आधी त्याचे ड्रायव्हिंग लॉयसन तपासले जाते, व ते कंपनीमध्ये जमा ठेवले जाते. चालकाच्या हातून अपघात झाल्यास, वाहन चलान झाल्यास किंवा चालकाने डिजेलची चोरी केल्यास त्याचे ड्रायव्हिंग लॉयसन प्रमाण म्हणून संबंधित विभागाला दिले जाते. वाहनांच्या डिजेल टॅंक पूर्ण भरलेल्या रहात असल्याने ड्रायव्हर डिजेल विकून फरार झाल्यास त्याचे ड्रायव्हिंग लॉयसन जमा असणे आवश्यक असते. मधल्या काळात या कंपनीतील कित्येक वाहन चालकांनी डिजेल विकून पोबारा केला आहे. त्यामुळे वाहन चालकाला वाहन चालविण्यास देतांना त्याचे ड्रायव्हिंग लॉयसन जमा ठेवण्याची पद्धत या कंपनीने अवलंबिली. मागील पंधरा वर्षांपेक्षाही अधिक काळापासून पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनी वणी क्षेत्रात कोळसा वाहतुकीचे काम करित आहे. या कंपनीत प्रेम दशरथ महतो (४२) रा. राजूर ईजारा हा ड्रॉयव्हर देखील मागील काही वर्षांपासून चालक म्हणून कामाला आहे. तो चालवत असलेले वाहन वरोरा येथे आरटीओ ने चलान केले. त्याकरिता त्याचे लॉयसन व वाहनाचे कागदपत्र कार्यवाही करिता आरटीओ एजंट कडे देण्यात आले. कार्यवाही सुरूच असतांना व तोही सेवेत असतांना अचानक त्याने ड्रायव्हिंग लॉयसन परत देण्याचा कंपनी व्यवस्थापकाकडे तगादा लावला. त्याची समजूत काढत असतांनाच तो आक्रमक झाला, व कंपनीचे व्यवस्थापक व त्यांचा प्रभारी मुलगा सुनीश सहानी यांच्याशी वाद घालू लागला. तो एवढ्यावरच न थांबता त्याने सहानी पिता पुत्राला शिवीगाळ करित धक्काबुक्की केली. तसेच सुनीष सहानी याचे अपहरण करण्याची धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकाराने घाबरलेले सहानी पिता पुत्र पोलिस स्टेशनला आले, व त्यांनी प्रेम महतो या चालकाविरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली.
दुसरीकडे प्रेम महतो या वाहन चालकानेही पोलिस स्टेशनला देऊन ड्रायव्हिंग लॉयसन मागितले असता कंपनीचे व्यवस्थापक व त्यांचा प्रभारी मुलगा सुनीश सहानी यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. काही कामाकरिता ड्रायव्हिंग लॉयसन परत मागितले असता कंपनी टाळाटाळ करीत असल्याने ड्रायव्हिंग लॉयसन गहाळ झाल्याचा संशय त्याला आला. त्यामुळे प्रेम महतो हा चालक ड्रायव्हिंग लॉयसन परत देण्याकरिता तगादा लावत होता. अशातच काल १७ डिसेंबरला ड्रायव्हिंग लॉयसन परत मागितले असता कंपनीचे व्यवस्थापक व त्यांचा मुलगा सुनीष सहानी यांनी मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. दोघांच्याही परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापक व त्यांचा मुलगा सुनीष सहानी तसेच चालक प्रेम महतो यांच्याविरुद्ध एनसी दाखल केली आहे.
ड्रायव्हिंग लॉयसन वरून ट्रान्सपोर्ट कंपनीचे व्यवस्थापक व चालकात झाली धक्काबुक्की
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 18, 2021
Rating:
