सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली अभिनव च्या उपचारासाठी आर्थिक मदत

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : वणीला सामाजिक कार्याची परंपरा अनेक वर्षापासून आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक संस्था येथे उभ्या राहिल्या. समाजाला दिशा देणाऱ्या अभिनव संकल्पना येथे जन्माला आल्या आहे. ताजे उदा. म्हणजे सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचे देता येईल.

दि.13 डिसेंबर 2021 ला रस्त्यावर अचानक आडव्या आलेल्या डुकराला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना वणी भालर मार्गावरील इंडो कोल वॉशेरीच्या समोर घडली होती.

भालर कॉलनी येथील वेकोलिच्या मुख्य महाप्रबंधक कार्यालयात प्रशिक्षणार्थी असलेले दोन युवक दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास भालर कडे जात असतांना अचानक रस्त्यावर डुकर आडवा आला. एकाएक आडवा आलेल्या डुकराला दुचाकीची जबर धडक बसली. त्यात अभिनव उसळून रस्त्यावर पडल्याने तो गंभीर जखमी झाला. धडक एवढी जोरदार होती की, डुकर चेंडू सारखे फेकल्या गेले व जागीच ठार झाले. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अभिनव व त्याच्या साथी दाराला ग्रामीण रुग्यालयात दाखल केले. आधी एकाला तर, काही वेळानंतर दुसऱ्यालाही चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले होते.

दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेल्या अभिनव कांबळे या युवकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला लगेच चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले व तो आता आय सी यु (ICU) मध्ये असल्याची माहिती आहे. अभिनव याचे वडील सकाळी पेपर वाटून आपल्या परिवाराचे गुजरान करतात. त्यामुळे अभिनव च्या उपचाराचा खर्च न परवडणारा असल्यामुळे उपचारासाठी आर्थिक मदत करावे असे माध्यमातून आवाहन करण्यात येत असतांना वणी येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी अभिनव कांबळे च्या उपचाराकरिता ऑनलाईन फोन पे वरून पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करून सामाजिक दायित्व जोपासले. तसेच वणीकर जनतेला अभिनव ला शक्य ती मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली अभिनव च्या उपचारासाठी आर्थिक मदत सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार व उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी केली अभिनव च्या उपचारासाठी आर्थिक मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.