सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे : मुंबई महानरपालिकेला आशिया खंडात महत्वाचं मानलं जातं. कारण भौगलिकदृष्ट्या, आर्थिकृष्टया या शहराचे महत्व देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड महत्वाचे आहे.येत्या काही महिन्यातच निवडणुका लागणार आहेत. त्या दृषटीकोनातून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. नुकतेच वंचित बहुजन आघाडीने मुंबई प्रदेशची कार्यकारणीजाहीर केली. या कार्यकारणी मध्ये वंचितने स्नेहल सोहनी या 24 वर्षाच्या तरुणीला मुंबईच्या उपाध्यक्ष पदी बसवले आहे.ही ना महिला आघाडी ना युवती आघाडी सरळ मेन स्ट्रीम मध्ये. अर्थातच तिचं आजवरच सामाजिक,धार्मिक व राजकीय चळवळीत योगदान तेवढच महत्वाचं आहे. अशा मुंबई महानगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी एका तरुणीला संधी देणं हे खरतर देशाच्या राजकारातील महत्वाचं पाऊल मानावं लागेल. कारण आजवर देशात राजकारण गडगंज संपती,राजकीय घराणेशाही यातून संध्या दिल्या जाताना आपण पाहिलं आहे. विशेषतः महिलांच्या बाबतीत हे प्रामुख्याने दिसून येत. पण वंचित ने मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एका तरुणीला संधी देऊन एक आदर्श निर्माण केला आहे.
स्नेहल फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील विचारशील सक्रिय कार्यकर्ता असून तिच्याकडे उत्कृष्ट वकृत्व आणि उत्तम संघटन कौशल्य आहे. येणाऱ्या काळात राज्याच्या राजकारणात हे नाव नक्कीच आपल्याला वेगळ्या उंचीवर पाहायला मिळेल अशी आशा आहे.