सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : प्रतिमा व प्रतिके ही समाजात उर्जा व चेतना निर्माण करतात. सामाजिक परिवर्तनासाठी ही प्रतिके महत्वाची भूमिका बजावितात असे स्मारके माेठ्या प्रमाणात निर्माण हाेणे महत्वाचे आहे असे मत चंद्रपूर जागरचे अशाेक तुमराम यांनी व्यक्त केले ते काल येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बाेलत हाेते.
जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मारकाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मागील अकरा महीन्यांच्या स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान, या दहा महीन्यांच्या कालावधीत अनेकदा मोर्चे, धरणे व उपोषणे करण्यात आलीत. याचे फलित म्हणजे काल गुरुवार दि. १६ डिसेंबरला आमदार तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले.
यावेळी मनपाच्या महापाैर राखी कंचर्लावार, उपमहापाैर राहुल पावडे, सभापती स्थाई समिती संदीप आवारी भाजपा शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे, माजी जि. प. अध्यक्ष देवराव भाेंगळे आदीं मान्यवरांची उपस्थिती होती. या आंदोलनाचे नेते अशोक तुमराम, पुरूषोत्तम सोयाम, अशोक ऊईके, गोकुल मेश्राम, चरणदास भगत, नरेन गेडाम, वामन गणवीर, कमलेश आत्राम, जितेश कुळमेथे इत्यादी आंदोलन सहकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार या वेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचा आरंभ महापौर राखी कंचर्लावार यांचे प्रास्ताविकाने झाला.आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हे आंदोलन आदिवासी बांधवांच्या चिकाटी व सातत्य याचे एक उत्तम उदाहरण आहे. जननायक बिरसा मुंडा यांच्या उलगुलानाला साक्षी ठेऊन आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय हक्कांसाठी लढले पाहिजे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जमुना तुमराम, वैशाली मेश्राम, प्रिती मडावी, चंद्रकला सोयाम, माया उइके, शितल कुळमेथे, शितल आत्राम, ज्योती गेडाम, जितेश कुळमेथे यांनी अथक परीश्रम घेतले.
उपराेक्त कार्यक्रमाला आदिवासी बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सदरहु कार्यक्रमाचे संचालन धनराज कोवे यांनी केले.
प्रतिमा व प्रतिके ही समाजासाठी उर्जा निर्माण करते-अशाेक तुमराम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 17, 2021
Rating:
