आ.किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्री


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज शुक्रवार दि.१७ डिसेंबरला एमपीएससी व युपीएससीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी राज्याचे मदत व पूनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांची पुस्तके वितरित करण्यात आली. सदरहु कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, काँग्रेसचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, माजी महापौर संगीता अमृतकर, नगर सेविका सुनिता लोढीया, नगर सेवक नंदु नागरकर, प्रदेश काँग्रेसचे कमिटीचे शिवा राव, सचिन कत्याल, माजी नगर सेवक बलराम डोडाणी व अजय जयस्वाल यांची उपस्थिती होती.

या शिवाय आयोजित या पुस्तक वितरण कार्यक्रमाला आज यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी व सदस्यगण माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या गर्दीने जनसंपर्क कार्यालय या वेळी अक्षरश: फुलुन गेले हाेते. चंद्रपुरकरांनी या कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
आ.किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्री आ.किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्री Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.