सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्र. 7 मध्ये दि.18 डिसेंबरला राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून पालक फिरोज पठाण, विजय दोडके, जेष्ठ शिक्षिका सिंधू गोवारदीपे उपस्थित होते.
या प्रसंगी फिरोज पठाण, विजय दोडके व सिंधू गोवरदीपे यांनी अल्पसंख्यांक दिनाविषयी माहिती दिली. अध्यक्षीय समारोप करतांना कासावार म्हणाले की, 18 डिसेंबर 1992 ला संयुक्त राष्ट्रसंघाने अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तुत केला. या अनुषंगाने अल्पसंख्याकांच्या हिताच्या रक्षणासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या निर्देशानुसार दरवर्षी अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन चंदू परेकर यांनी केले. आभारप्रदर्शन विजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्पना मुंजेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर यांनी परिश्रम घेतले.
वणीत राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 18, 2021
Rating:
