टॉप बातम्या

नरसाळा येथील गिट्टी स्टोन क्रेशर ठरत आहे घातक


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील नरसाळा हे गाव ओधोगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. परंतु या गावाचा पाहिजे त्या दृष्टीने काही विकास झालेला नाही. विशेष उल्लेखनीय असे की, नरसाळा हे गाव पेसा अंतर्गत येत असल्यामुळे या गावाला विशेष नियम व अटी आहे त्या नियम व अटींना स्टोन क्रेशर धारकांनी धाब्यावर ठेऊन जो तो आपलाच मनमानी कारभार करीत आहे.

स्टोन क्रेशर गावालगत असल्यामुळे गिट्टीच्या धुरा मुळे प्रदूषणाची समस्या खूप गंभीर झाली आहे. 
दिवस रात्र हे स्टोन क्रेशर चालू असून गिट्टीचा धुरामध्ये वाढ झाली असून ती आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे दमा त्वचा संबंधित रोग कँसर आणि नागरिकांना स्वास घेण्यास खूप त्रास होत आहे.

गावा लगत असलेले स्टोन क्रेशर नियमबाह्य येत असल्यामुळे ते क्रेशर बंद करा,अशी ओरड नागरिकांमध्ये होत आहे.
Previous Post Next Post