नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रमास प्रारंभ

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्ट्याची स्थापना व फलकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित वनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना अतिशय नाममात्र शुल्कामध्ये म्हणजेच एक रुपया रोज याप्रमाणे आय. ए. एस. आपल्या भेटीला,उद्योजक आपल्या भेटीला हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. करियर कट्टा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर अनेक रोजगाराभिमुख व कौशल्य विकासावर आधारित असणारे विविध कोर्स,भारतीय संविधानाचे पारायण रोज ऑनलाइन घेण्यात येईल, वृत्तवेध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, फाउंडेशन कोर्स स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी, सायबर सेक्युरिटी कोर्स तांत्रिक शाखेतील (टेक्निकल) विद्यार्थ्यांसाठी, ई - फायलिंग कोर्स वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी असे विविध कोर्स मोफत ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व समन्वयक डॉ.रोहित वनकर यांनी या प्रसंगी केले. यावेळी प्रा.अकाश धांडे व प्रा. सारनाथ नगराळे उपस्थित होते. आभार व सूत्रसंचालन प्रा. अरुण अंभोरे यांनी केले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रमास प्रारंभ नूरजहाँ बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालयात करियर कट्टा उपक्रमास प्रारंभ Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.