वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : दिवसांगणिक वाघाचे हल्ले हाेण्यांच्या घटना अधिक वाढत असुन अश्यातच आज गुरुवार दि.१६ डिसेंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या पाेंभूर्णा तालुक्यात मार्निंग वाकला जाणा-या एका महिलेवर सकाळी सहा वाजता वाघाने हल्ला केल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुख:द घटना घडली. या घटनेतील मृतक महिलेचे नाव संध्या विलास बावणे असुन ती वेळवा येथील मुळ रहिवाशी असल्याचे सांगितल्या जाते. मृतक ३५ वर्षिय संध्याला एक मुलगा व मुलगी असुन ते शिक्षण घेत आहे.

वाघाने हल्ला केला त्या वेळेस काही लाेक सकाळी फिरायला त्याच मार्गावर आले हाेते त्यांनी हा हल्ला बघताच आरडा आेरड सुरु केली. तेव्हा महिलेवर हल्ला करणारा वाघ पळुन गेला हाेता. पण त्या आधीच वाघाने महिलेला ठार केले हाेते.

घटनेची माहिती हाेताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ते या घटनेबाबत अधिक चाैकशी करीत आहे. ग्रामीण भागात दिवसा ढवळ्या घडणा-या अश्या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतक-यांना नित्य शेतीच्या कामासाठी शेतीत जावे लागते.
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार वाघाच्या हल्ल्यात महिला ठार Reviewed by सह्याद्री चौफेर on December 17, 2021 Rating: 5
Powered by Blogger.