सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : गडचिरोली जिल्ह्याच्या मौजा मसेली येथे आदिवासी एकता युवा परिषदेच्या वतीने दि.१५ डिसेंबरला परधान एकता दिवस साजरा करण्यात आला.शासनाने १७ आदिवासी जमातीचे संशोधनपर जीआर (GR) काढल्यामुळे दि. 15/12/2015 ला नागपुरात विधानसभा हिवाळी अधिवेशनात लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातून परधान समाज सहभागी झाला होता.हा दिवस अनेक ठिकाणी आदिवासी परधान समाजाचे अस्मिता व एकता दिवस म्हणुन साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मसली येथे या दिवसाचे आयोजन करण्यात आले हाेते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी कवियत्री व साहित्यिक कुसुम अलाम यांनी विभूषित केले हाेते.
आदिवासी समाजात विकास घडवून आणणारे बाबुराव मडावी असुन सर्वच आदिवासींची दयनीय अवस्था पाहून त्यांनी जंगल कामगार सोसायटी काढली यामुळे आर्थिक विकास व रोजगार उपलब्ध करून दिले. अनेक योजना दिल्याने आदिवासी विकास घडून आला.आपण त्यांच्या कार्याची जाण ठेवून संघटीत झाले पाहिजे.त्यांनी सर्व आदिवासींच्या पोटजातीना सुरक्षित ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आदिवासी एकता युवा परिषदचे कार्यकर्ते पुढे आले असल्याच्या कुसुम अलाम या वेळी बाेलतांना आपल्या भाषणात म्हणाल्या.
सदरहु कार्यक्रमाचे निमित्ताने समाजिक एकतेची जाणीव करून देत हे आश्वासक पाऊल असुन संघटनेस बळकट करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन चाेखाजी शिडाम यांनी केले. प्रास्ताविक लुमेश्वर मडावी यांनी केले तर आभार प्रदर्शन सातव्या वर्गात शिकत असलेल्या कु. सिध्दी लुमेश्वर मडावीने केले.
कार्यक्रमाला नगर परिषदेचे अध्यक्ष संजय ऊईके, माणिक गेडाम, संजय मेश्राम, गिरीष ऊईके, मुकूंदा नैताम, आकाश कोडापे, उमेश ऊईके, महादेव मसराम, मधुकर आत्राम, नामदेव मडावी, टिकाराम मडावी,अनुरथ आत्राम, शामराव आत्राम, अशोक सिडाम, वेदिंता आत्राम, मंजुळाबाई सिडाम, दौलत सिडाम, लता सलामे, माया सिडाम, व गावातील परधान समाज बांधव उपस्थित होता.
मसेली येथे आदिवासी परधान एकता दिवस झाला थाटात साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 17, 2021
Rating:
