टॉप बातम्या

27 वर्षीय युवकांकडून विधवा महिलेचे शारीरिक शोषण


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यातील एका 27 वर्षीय युवकाने विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण करून गर्भवती केल्याची घटना घोडदरा येथे घडली.
पिडीत विधवा महिलेने युवकाला  लग्नकरण्यासाठी विचारणा केली. परंतु आरोपीने लग्नास नकार दिला असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं.

घोडडारा येथील एका 37 वर्षांच्या विधावा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन मारेगाव पोलिसांनी आपोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.  प्रताप गजानन जिवतोडे (27)  रा.घोडदरा असे पीडितेचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 
 
सदर पीडित महिलेच्या पतीचे 2011 मध्ये निधन झाले. सध्या ती आपल्या मुलासोबत घोडदरा येथे वास्तव्यास आहे. अशातच महिलेशी ओळख झाली. पीडित मुलासोबत एकटी राहत असल्याचे समजल्यानंतर त्याने मैत्री वाढली. हळूहळू आरोपीचे विविध कारणाने घरी येणे-जाणे सुरू झाल्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले असता, पिडीत विधवा महिला ही सात महिन्याची गर्भवती राहील्याने त्याच्याकडे लग्नाचा तागदा लावला. मात्र, प्रताप ने लग्नास नकार दिला असल्याने पिडीत महिलेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कारासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला. 
Previous Post Next Post