सह्याद्री न्यूज | विलास पिसे
नेरी : तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज संताजी मंच नेरी यांच्या वतीने साजरी करण्यात आली. आरंभी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीचे पूजन प्रभाकर पिसे व वसंत आष्टनकर यांनी केले. त्या नंतर ध्वजारोहण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी श्री संताजी महाराज की जय अशा घोषणा देऊन (तेली) ओबीसी समाजाला आरक्षण मिळालाच पाहिजे अशा ही घोषणा देण्यात आल्या.
समाजावर होणाऱ्या अन्यायाला जागृत करण्यासाठी या वेळी अनेकांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला राजू पिसे, मंगेश वासेकर, निखील पिसे, पिंटू खाटीक, विलास पिसे, रवी चुटे, सुनिल पिसे, हर्षल कामडी,जय वाघे, तसेच तेली समाज बांधव उपस्थित होते.
नेरीत संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 08, 2021
Rating:
