चंद्रपूर: खनिकर्म पथकातील अल्का खेडकर यांच्या धडक कारवाया, अवैध रेतीची दाेन वाहने जप्त

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : शहरासह जिल्ह्यातील अवैध रेती तथा अन्य गाैण खनिजांवर अंकुश तथा दंडात्मक कारवायां करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाने कंबर कसली असून जिवाची पर्वा न करता गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहनांवर कारवायां करण्यासाठी पाऊल उचलल्याचे एकंदरीत दिसून येते. अशातच रविवारला रात्री अंदाजे ९:३० वाजताच्या दरम्यान स्थानिक नेहरू नगर चाैकात दाेन अवैध रेतीची वाहने येथील खनिकर्म विभागाच्या पथकाने पकडुन ती दंडात्मक कारवायासाठी खनिकर्म कार्यालयात जमा केली असल्याचे वृत्त आहे.

या घटनेतील जप्त केलेली ही (दाेन हायवा) वाहने शहरातील देविदास वाघ यांचे मालकीचे असल्याचे समजते. एका वाहनावर प्रति दाेन लाख सत्यात्तर हजार सातशे रुपये दंड आकारण्यात आला असून सदरहु कारवाया अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर तथा जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांचे मार्गदर्शनाखाली अल्का खेडकर, बंडु वरखेडे, दिलीप माेडके यांनी केल्या आहे. उपराेक्त कारवाया मुळे  जिल्हातील अवैध रेती वाहतुक करणांऱ्या रेती तस्करांचे अक्षरश: धाबे दणाणले आहे. खनिकर्म विभागाच्या कारवायां सातत्याने सुरु असल्यामुळे शासनाच्या तिजाेरीत दंडात्मक कारवायापाेटी माेठी रक्कम जमा हाेत असल्याचे बाेलल्या जाते.
चंद्रपूर: खनिकर्म पथकातील अल्का खेडकर यांच्या धडक कारवाया, अवैध रेतीची दाेन वाहने जप्त चंद्रपूर: खनिकर्म पथकातील अल्का खेडकर यांच्या धडक कारवाया, अवैध रेतीची दाेन वाहने जप्त  Reviewed by सह्याद्री चौफेर on December 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.