सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
मृतक हा तालुक्यातील झोला गावाजवळ असलेल्या वॉटर प्लांटमध्ये काम करत होता. त्याला गावावरून आणखी दोन मजूर कामावर आणण्याकरिता कामावरून सुटी देण्यात आली होती. त्यानंतर तो जैन ले-आऊट मधील आपल्या नातेवाईकाच्या घरी गेला. तेथून तो गावाकडे जातो म्हणून दुचाकीने निघाला. दरम्यान राजूर बायपास वळण रस्त्याजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात तो उसळून रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करित मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आज शवविच्छेदन करून मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतक मोहन जांभुळकर यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा आप्त परिवार आहे. एका मुलीचे लग्न झाले असून दोन मुलींची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या या अशा अपघाती जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
पुढील तपास पोलिस करित आहे.
अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 11, 2021
Rating:
