सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
खडबडा मोहल्ला येथून गोवंश जनावरांची अवैध विक्रीकरिता वाहतूक केली जाणार असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. ऑल आऊट स्किम ड्युटीवर असलेल्या एपीआय माया चाटसे यांना सोबत घेऊन डीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकली. तेथे MH ३४ BG २८८४ या मालवाहू वाहनात सात जनावरे कोंबून असलेली व चार जनावरे वाहनात भरण्याची तयारी सुरु असल्याचे पोलिसांना आढळले. जनावरांची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या राजू मधुकर झिलपे (२५) रा. रंगनाथ नगर, इलियास अली खान मुमताज अली खान (४०) रा. गोकुळनगर, शहारूख खान लायलाभ खान (२८) रा. रंगनाथ नगर या तिन तस्करांना पोलिसांनी अटक करून ११ गोवंश जनावरांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी घटनास्थळावरून एका मालवाहू वाहनासह ११ गोवंश जनावरे असा एकूण ७ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, एपीआय माया चाटसे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अविनाश बानकर, अशोक टेकाडे, विशाल गेडाम, शंकर चौधरी यांनी केली.
खडबडा मोहल्ला येथे पोलिसांची धाड, गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव उधळून केली ११ जनावरांची सुटका
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 11, 2021
Rating:
