किरण घाटे | किरण घाटे
चंद्रपूर : कांपा ते नागपूर या महामार्गावर चंद्रपूर गडचिराेली असा दिशा दर्शक बोर्ड गेल्या ब-याच वर्षापासून लावल्याचे बघावयास मिळते परंतु या बाेर्डला मध्यंतरी काेणत्या तरी वाहनाने धडक दिल्यामुळे ताे पुर्णता वाकलेला अवस्थेत व धाेकादायक परिस्थिती उभा असल्याचे प्रत्यक्षात दिसून येते. भविष्यात या बाेर्डमुळे अपघात हाेण्यांची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन अनेक माेठ्या वाहनांसह छाेट्या वाहनांची वर्दळ दिवस रात्र सुरु असते.वाकलेला अवस्थेत असलेला हा धाेकादायक दिशा दर्शक बाेर्ड त्वरीत काढुन टाकावा व त्या ठिकाणी नविन बोर्ड लावावा. अशी मागणी नागभिड प्रहारचे वृक्षभ खापर्डे, विक्की फुलवाणी, निलेश डाेमडे, पप्पु देशमुख, अतुल खेडेकर, दीपक मानुसमारे, निखिल मेश्राम, राेहित कुमरे, आकाश चौधरी, देवनाथ रामटेके संताेष जिवताेडे सह या भागातील जनतेंनी केली आहे.पण प्रशासनान खराेखरंच या बाेर्डची दखल घेतील काय याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
"या" धाेकादायक दिशादर्शक बोर्ड कडे लक्ष काेण पुरविणार ?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 12, 2021
Rating:
