अनुसुचित जमाती व इत्तर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा - राजु झोडेंची मागणी


सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

चंद्रपुर : अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकऱ्यांवरील अन्याय चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. वन विभागाचा व संबंधित प्रशासनाचा जबरान जोत शेतकऱ्यांवरील वाढता अन्याय बघता वन हक्क मान्य करणे २००६ या कायद्याची पायमल्ली प्रशासन करत आहे असा आरोप वंचितचे नेते राजू झोडे यांनी काल शुक्रवारी केला.जबरान जोत शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीकरिता राजू झोडे,जबरान जोत आदिवासी व गैर आदिवासी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातुन मागणी केली आहे.
  
तदवतचं शेतकऱ्यांचे दावे प्रलंबित असतानाही व काही शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निकाल अजून पर्यंत लागलेला नसताना ही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना शेतीपासून रोखण्याचे काम करीत आहेत. अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांचा दाव्यांचा निकाल अजून लागलेला नाही. निकाल लागला असल्यास अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. शेतकऱ्यांचे दावे कोणत्या कारणाने प्रलंबित आहेत ते देखील सांगितले गेले नाही.१३ डिसेंबर २००५ च्या पूर्वीपासून पीडित शेतकरी आपली शेती कसत आहेत. परंतु वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी शेतपिकांची नासाडी करणे, मारझोड करणे, धमकावणे व रजीस्टरवर खोट्या स्वाक्षरी घेण्याकरिता जोर जबरदस्ती करतात. इतकेच नाही तर सदरहु जमिनीवर कब्जा करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी अशिक्षित लोकांना धमकावून स्वाक्षऱ्या करायला भाग पाडत आहेत. जोपर्यंत शेतकर्‍यांनी टाकलेल्या दाव्यांचा निकाल लागत नाही तोपर्यंत वनविभागाने कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये व शेती करण्यांपासून रोखू नये. रोखल्यास अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. जेव्हा पर्यंत दाव्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत नियमांचे उल्लंघन करू नये असा आदेश प्रशासनाने द्यावा. वन हक्क २००६ च्या कायद्याचे इत्यंभूत ज्ञान असणारी समिती नेमून खारीज केलेल्या दाव्यांचा पुनर्विचार करावा. वनविभाग ज्या मुना-या लावत आहेत त्या तात्काळ बंद करण्यात याव्या तसेच मुना-या लावण्याच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश द्यावे.

वन्यप्राण्यांच्या धोक्यापासून संरक्षण मिळण्याकरिता शेतीसाठी सौर कुंपण शासनाच्यावतीने देण्यात यावे अशा अनेक मुलभूत मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे व जबरान जोत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले उपराेक्त मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जिल्हा कचेरीसमोर संपूर्ण जबरान जोत शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदाेलन करणार असल्याचा इशारा राजू झोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.
अनुसुचित जमाती व इत्तर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा - राजु झोडेंची मागणी अनुसुचित जमाती व इत्तर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा - राजु झोडेंची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.