भद्रावती तालुक्यातील तत्कालीन बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस नंतर आता तहसीलदार डॉ. निलेश खटके एसीबीच्या जाळ्यात
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील भद्रावती तहसील अंतर्गत येणा-या नंदाेरी येथील तत्कालीन बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस यास एका शेतक-याकडुन फेरफार रुजू करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेतांना काही दिवसांपुर्वी चंद्रपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्या नंतर काल शनिवार दि. ११ डिसेंबरला याच भद्रावती तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉ.निलेश खटके यांना तब्बल २५ हजार रुपयांची एका जणांकडुन लाच स्विकारतांना नागपूर एसीबीच्या अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांना रंगेहात पकडल्याची घटना घडली. या घटनेमुळे भद्रावती शहरासह चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे. गल्लेलठ्ठ वेतन असतांना देखिल डॉ.खटके यांना लाचेचा माेह टाळता आला नाही हे तितकेच खरे आहे. या आधी ते चंद्रपूर जिल्ह्याच्या पाेंभर्णा तहसील कार्यालयाला तहसीलदार म्हणुन कार्यरत हाेते. लाच घेणे व देणे हे कायद्याने गुन्हा आहे याची पुरेपूर कल्पना असतांना देखिल त्यांनी लाच स्विकारली व ते अलगद एसीबीच्या जाळ्यात अडकले.
काेरपना महसुल विभागातील वरिष्ठ लिपिक विलास ठमके हे देखिल काही दिवसांपुर्वी चंद्रपूर एसीबीच्या जाळ्यात अडकले हाेते हे येथे उल्लेखनिय आहे.
भद्रावती तालुक्यातील तत्कालीन बहुचर्चित मंडळ अधिकारी प्रशांत बैस नंतर आता तहसीलदार डॉ. निलेश खटके एसीबीच्या जाळ्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 12, 2021
Rating:
