बेपत्ता वृद्ध महिलेचा अखेर वर्धा नदीत मृतदेहच आढळला

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : बेपत्ता वृद्ध महिलेचा अखेर वर्धा नदी पात्रात मृतदेहच आढळून आल्याने ती नदीत उतरली की, घसरून पडली, हा प्रश्न निर्माण आता झाला आहे. शेतात जातो म्हणून घरून बाहेर पडलेली वृद्ध महिला खूप वेळ होऊनही घरी न परतल्याने तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला. ती नदीत तर बुडाली नसावी, हा संशयही कुटुंबियांना आल्याने त्यांनी तिचा नदी पात्रतही कसून शोध घेतला. दरम्यान आज गावकऱ्यांनी नदी पात्रात सुरु केलेल्या शोध मोहिमेत तिचा मृतदेहच आढळून आला. मंजुळा महादेव तुराणकर (७०) रा. कोना असे या नदीत बुडालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे. 

ही वृद्ध महिला १९ डिसेंबरला दुपारी १२ वाजता शेतात जाण्याचे कारण सांगून घराबाहेर पडली. त्यानंतर ती खूप वेळ पर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोधाशोध सुरु केला. ती नदीत तर बुडाली नसावी, असा संशय आल्याने गावकरी तिचा नदी पात्रतही शोध घेत होते. आज २१ डिसेंबरला परत गावकऱ्यांनी नदी पात्रात शोध मोहीम सुरु केली असता दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास अखेर तिचा मृतदेह हाती लागला. त्यामुळे ती नदीत उतरली की, घसरून पडली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वर्धा नदीलगतच शेत असल्याने ती नदीत बुडाली असावी, असा संशय आल्याने कुटुंबीय व गावकरी दिवसरात्र तीचा नदी पात्रात शोध घेत होते. याबाबत पोलिसांनाही कळविण्यात आले होते. दरम्यान आज नदी पात्रात तिचा मृतदेहच आढळून आला. 

पुढील तपास पोलिस करित आहेत.
बेपत्ता वृद्ध महिलेचा अखेर वर्धा नदीत मृतदेहच आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा अखेर वर्धा नदीत मृतदेहच आढळला Reviewed by सह्याद्री चौफेर on December 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.