सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे
ठाणेदार श्याम सोनटक्के यांना २१ डिसेंबरला सकाळी ११ वाजता शहरातील एका सराईत गुन्हेगाराने कुठे तरी चोरी करून तो चोरीचा मुद्देमाल विकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. ठाणेदारांनी लगेच एपीआय माया चाटसे व डीबी पथकाला त्याचा मागोवा घेण्यास सांगितले. डीबी पथकाने त्याचा सुगावा लावत त्याला वणी शिरपूर रोडवरील मांडवकर यांच्या बियरबार जवळ गाठले. पोलिस दिसताच गब्ब्या वाहनातून उतरून पळू लागला. पण डीबी पथकाने दौड लावून त्याला पकडले, व त्याच्यावर दोन वेगवेगळे चोरीचे गुन्हे दाखल केले. चोरी केलेले चारचाकी वाहन क्रं. MH २९ T ३४१६ किंमत ३ लाख ५० हजार रुपये, भंगार साहित्य किंमत ४५० रुपये व २५ ते ३० किलो वजनाचे तांदळाचे ७ कठ्ठे किंमत १५ हजार रुपये असा एकूण ३ लाख ६६ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी नावेद उर्फ गब्ब्या मो. कादिर (३९) रा. मोमीनपुरा या चोरट्याकडून जप्त केला. त्याला पोलिस स्टेशनला आणून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ सहकलम ४६१, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलिप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, सपोनि माया चाटसे, पोउपनि शिवाजी टिपूर्णे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, हरविंदर भारती, अविनाश वनकर यांनी केली.
सराईत गुन्हेगार गब्ब्याला पोलिसांनी सिनेस्टाइल दौड लावून केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 21, 2021
Rating:
