सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपुरात नव्याने निर्मित होत असलेल्या मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाचा ठेका शापुर्जी अंड पोलोंजी कंपनीकडे असुन कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देणे, ओव्हर टाईम न देणे, पुर्वसुचना न देता कामावरुन कमी करणे,बँकेत पेमेंट न देता तो रोखीने देऊन कामगारांची फसवणूक करणे अश्या प्रकारच्या एक नाही तर अनेक तक्रारी शहरातील प्रहारचे युवा नेता महेश हजारे यांच्याकडे संबधीत कामगारांनी दिल्या होत्या, तेव्हा या तक्रारीची तात्काळ दखल घेत महेश हजारे यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांकडे या बाबतीत तक्रार नाेदविली व काही दिवसांतच ओव्हर टाईम काम करणांऱ्या काही कामगारांना डबल ओवर टाईमसहीत 17 ते 18 लाख रुपये प्रहारच्या माध्यमातुन मिळवुन दिले.
परंतु सुड भावनेतुन काही दिवसातच या सर्व कामगारांना कामावरुन कमी केले असता, प्रहारच्या वतीने याचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. एव्हढेच नाही तर संबधित शापुर्जी पालोंजी कंपनीच्या हुकुमशाही आणि लुटारु व्यवस्थेची सखाेल चौकशी करण्याची मागणी कामगार आयुक्त मुंबई यांच्याकडे सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपुर यांच्या मार्फत करण्यांत आली हाेती. तेव्हा कामगार आयुक्त मुंबई यांनी सुचना देताच तात्काळ या बाबतीत अप्पर कामगार आयुक्त कार्यालय नागपुरच्या टिमने कामाच्या ठिकानी जाऊन निरीक्षण केले असता त्या ठिकाणी अनेक त्रुटी आढळुन आल्या व त्या प्रमाणे उपराेक्त त्रूटी प्रकरणातील अहवाल सात दिवसांच्या आत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपुर येथे सादर करण्याचे लेखी आदेश शापुर्जीच्या प्रोजेक्ट हेडला दिले हाेते. परंतु सतत टाळाटाळ करीत असलेल्या शापुर्जी पोलोंजी कं. कंपनीकडुन सहाय्यक कामगार कार्यालयाला लेखी ऊत्तर दिले, परंतु ज्या समस्यांसाठी इंस्पेक्शनची मागणी केली होती त्याचा कुठेही लेखी अहवाल सादर केला नाही. ऊलट आर.सी प्रसाद या सब कॉन्ट्रेक्टरच्या बोगस कारभाराला लपवण्याचा प्रकार होत आहे व काही कामगारांचे पंचिंग रिपोर्ट जमा केले नाही तरी देखील सहाय्यक कामगार आयुक्त शांत कसे असा स्पष्ट आरोप महेश हजारे यांनी केला आहे.
आज दि.२१ डिसेंबरला प्रहारचे महेश हजारे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भाेईत यांची भेट घेतली. परंतु या बाबतीत त्या जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असुन कामगारांची दिशाभुल करीत कंपनीची बाजु मांडत असल्याचे लक्षात आले असे प्रहार सेवक महेश हजारे यांनी म्हटले आहे.
या बाबतीत योग्य चाैकशी आणि कार्यवाही झाली नाही तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चंद्रपुर यांना प्रहार स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा प्रहारचे महेश हजारे यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना दिला.
कामगारांना याेग्य न्याय न मिळाल्यास प्रहार स्टाईलने उत्तर देवू - महेश हजारेंचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 21, 2021
Rating:
