चंद्रपूरच्या श्री विठ्ठल व्यायाम शाळेची रंगतदार व अटीतटीची निवडणूक संपन्न


सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : काल रविवारी चंद्रपूर शहरातील श्री विठ्ठल व्यायाम शाळेची निवडणूक अत्यंत चुरशीची व रंगतदार पार पडली. ही निवडणूक एकुण १३ सदस्य पदांसाठी झाली दरम्यान स्व.वस्ताद दादाभाऊ येरेवार व शरद टेकूलवार या (दाेन) पॅनलचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले हाेते. या शिवाय नव अपक्ष उमेदवारांनी आपले भाग्य अजमावून पाहण्यासाठी निवडणूक मैदानात उडी घेतली हाेती.

रविवारी संध्याकाळी पाच वाजे पर्यंत मतदान झाल्या नंतर संध्याकाळी सात वाजता मतमाेजनी प्रक्रिया आरंभ झाली. ही मतमाेजनी साेमवारी सकाळी आठ वाजता पूर्ण झाली अनेकांचे या निवडणूकीकडे लक्ष वेधले हाेते. तब्बल ३५ वर्षानंतर प्रथमच पार पडलेल्या या निवडणूकीत स्व.वस्ताद येरेवार गटाचे वर्चस्व कायम राहिले त्यांनी आठ सदस्य पद जिंकले तर शरद टेकूलवार पॅनलला चार सदस्य पदावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे नव अपक्ष उमेदवारांपैकी एका अपक्ष उमेदवाराने या निवडणूकीत यश संपादन केले.

सदरहु निवडणूकीत १३सदस्य पदासाठी एकंदर ४९९ सभासदांना आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यांचा अधिकार हाेता. त्यात अंदाजे ९५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेकांना या निवडणूक निकालाची उत्सुकता लागली हाेती.विठ्ठल मंदिर वार्ड परिसरात निकाल ऐकण्यासाठी रात्री उशिरा पर्यंत एकच गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत हाेते. निकाल घाेषित हाेताच विजयी उमेदवारांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आंनदाेत्सव साजरा केला.
स्व.दादाभाऊ येरेवार पॅनल कडुन किरण तुकाराम माेडकवार यांनी ही निवडणूक लढवली व ते यात विजयी देखिल झाले. मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.सुरेश राजेराम मेश्राम यांनी आपली जबाबदारी पार पाडली. मतदान माेजणी स्थळी पाेलिस प्रशासनाच्या वतीने पाेलिस बंदोबस्त चाेख ठेवण्यांत आला हाेता.

सदरहु पार पडलेल्या निवडणूकीत अनुक्रमे बाळकृष्ण अंबिरवार, अशाेक अंबिरवार, भैय्याजी अवघडे, सुनील भाेयर, अभय बडकेलवार, प्रसाद बडकेलवार, परशुराम दुरतकर, पराग केमेकर, अमाेल कटलावार, किरण माेडकवार, प्रतीक पडगेलवार, निलेश रामेडवार, धनंजय येरेवार यांनी विजय संपादन केला सर्वाधिक मते अशाेक अंबिरवार यांना तर, सर्वाधिक कमी मते प्रसाद पडगेलवार यांनी पडली असल्याचे समजते.
चंद्रपूरच्या श्री विठ्ठल व्यायाम शाळेची रंगतदार व अटीतटीची निवडणूक संपन्न चंद्रपूरच्या श्री विठ्ठल व्यायाम शाळेची रंगतदार व अटीतटीची निवडणूक संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on December 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.