वेकोली कर्मचारऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, जैन ले-आऊट येथिल घटना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वेकोली कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना आज 20 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सचिन बाबुराव बोभाटे (39) रा. जैन ले-आऊट असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत त्याच्या वडिलाने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी नुसार वणी वरोरा मार्गावरील मंदिरात ओळखीतल्या व्यक्तीचे जेवण असल्याने घरातील सर्व मंडळी दुपारी 3 वाजता जेवण करण्याकरिता गेली होती. मंदिरात जेवण करुन आई, वडिल, पत्नी व मुले घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा बंद दिसला. घराच्या मागच्या बाजुने घरात जाऊन बघितले असता सचिन हा पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला एक वर्षापासून पायाच्या दुखण्याचा आजार असून त्याचा शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. तो वेकोलीच्या कोळसा खणीत कार्यरत होता. आज अचानक त्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून आत्महत्या केल्याने कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, हे आद्यापही कळू शकलेले नाही. त्याच्या पश्चात सेवानिवृत्त वडिल, आई, पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्त परिवार आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. 

पुढील तपास पोलिस करित आहे.
वेकोली कर्मचारऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, जैन ले-आऊट येथिल घटना वेकोली कर्मचारऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, जैन ले-आऊट येथिल घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on December 20, 2021 Rating: 5
Powered by Blogger.