सह्याद्री प्रशांत चंदनखेडे
राजूर कॉलरी परिसरात असलेल्या एका चुन्याच्या कारखान्यामध्ये मजुरांना राहण्याकरिता छोट्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांकरिता तेथेच राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याने मजुरांच्या तेथे राहुट्या तयार झाल्या आहेत. या कारखान्यात काम करणाऱ्या व तेथीलच निवाऱ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या एका मजुराच्या घरासमोर पहाटे काही नागरिकांना एक युवक जमिनीवर पडलेला दिसला. तो कसलीही हालचाल करित नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय नागरिकांना आला. चुना कारखान्यातील मजुराच्या खोलीजवळ युवक मृतावस्थेत पडून असल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली. नंतर ही माहिती पोलिस स्टेशनला मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अतुल खोब्रागडे हा मजुरांच्या खोलीवर कशासाठी गेला, त्याचा मृत्यू नेमका कसा झाला व त्या खोलीत नेमके काय घडले, या बाबी शंकेचं दार ठोठावत असून याच निराकरण तपासाअंतीच होणार आहे. ज्या मजुराच्या खोलीजवळ हा मृतदेह आढळून आला, तो मजूर स्त्री आहे की पुरुष, याची अद्याप शहनिशा झाली नसून गावात मात्र युवकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने चर्चांना पेव फुटले आहे.
पुढील तपास ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात पोउनि शिवाजी टिपूर्णे करीत आहेत.
राजूर (कॉ.) येथे एका चुना कारखान्यातील मजुराच्या खोलीजवळ आढळला युवकाचा मृतदेह
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 20, 2021
Rating:
