सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : आज रविवार दि.१९ डिसेंबरला स्थानिक चंद्रपूर बल्हारपूर मार्गावर असलेल्या बाबूपेठ येथील रेल्वे पुलावरुन चार चाकी वाहन काेसळल्यामुळे एकास आपला प्राण गमवावा लागल्याची दुदैवी घटना घडली. याच वाहनात असणारे अन्य तीन जण जखमी झाले असल्याचे खात्री लायक वृत्त आहे. उपराेक्त घटने़ची बातमी शहरात वा-यासारखी पसरताच घटनास्थळी लाेकांची एकच गर्दी उसळली हाेती.
दरम्यान उड्डान पुल परिसरात असलेल्या एका मैदानावर काही तरुणांना हे वृत्त कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून त्या चार चाकी वाहनातील यूवकांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. उपरोक्त घटनेतील वाहन बल्हारपूर शहरातील असल्याची चर्चा घटनास्थळी हाेती. या वाहनातुन येणारे हे यूवक मद्यप्राशन करुन असल्याचा संशय अनेकांनी या वेळी व्यक्त केला.
जखमी असणां-या तीन युवकांना पुढील उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले असुन त्यातील एकाची प्रक्रूती गंभीर आहे. डॉक्टर मंडळी त्यांचेवर उपचार करीत आहे. एम .एच. ३४ बिआर ०१४१ या क्रमांकाचे चार चाकी वाहन चालक अतिशय वेगाने चालवित हाेता असे अनेकांचे म्हणणे आहे. अपघात ग्रस्त वाहनातील चार ही युवक बल्हारपूर येथील रहिवाशी असल्याचे समजते.
चंद्रपूर-बल्हारपूर मार्गावरील उड्डाणपूलवरून चारचाकी वाहन काेसळून एक ठार तर ३ जखमी !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 19, 2021
Rating:
