सह्याद्री न्यूज नेटवर्क |
झरी : झरी तालुक्यातील मुकुटबंन हा परिसर औद्योगिक वसाहत म्हणून नावारूपास आला आहे. अडेगाव येथे डोलोमाईट, गणेशपूर येथे चुना कंपन्या, मुकुटबंन येथे कोल माईन्स, बिरला सिमेंट प्रोजेक्ट, पांढरकवडा येथील इस्पात कंपनी अशी अनेक छोटी मोठी उद्योग या परिसरात आहे. शेती जाऊन त्या जागी झालेल्या कंपन्या मुळे येथे बेरोजगार संख्या अधीक, यात परराज्यातून अनेक कामगार आलेे. त्यामुळे या शिबिरास अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मुकुटबंन येथे रविवार व सोमवार या दिवशी शिबीर होणार आहे. परिसरातील सरपंच यांच्या उपस्थितीत शिबिर संपन्न होईल.
या शिबिरात बांधकाम कामगार, रस्त्यावरील विक्रेते, घरकाम करणाऱ्या महिला, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, ऑटो चालक, वृत्तपत्रे विक्रेते, पशुपालन कामगार, शिलाई मशीन कामगार, सुतार काम करणारी व्यक्ती, आशा व अंगणवाडी सेविका, मिठ कामगार, न्हावी कामगार, पिठ गिरणी, ब्युटी पार्लर, पेंटर, इलेक्टरेशीयन, प्लंबर या सर्व कामगारांना आपली नोंद या शिबिरात करता येणार आहे.
कार्डधारकांना वित्तीय सहायता, मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत, मातृत्व लाभ, घर बांधणी आर्थिक सहाय्य अशी काही सरकारी मदत घेता येणार आहे.
यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक व मोबाईल न. ची गरज राहील.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी देव येवले तालुका अध्यक्ष, अनिलभाऊ कडू, शंकर झाडे (पंचायत समिती सर्कल प्रमुख अडेगाव कोसारा), समीर लेनगुडे (झरी पंचायत समिती सर्कल प्रमुख), सचिन टोंगे, प्रशांत बोबडे, संदिप आसुटकार, सुरज सुरपाम वेदड, अनिकेत टोंगे भेंडाला, कामतकर खातेरा, किशोर क्षीरसागर डोंगरगाव, छंदक तेलंग मांगली, फैजल शेख मुकुटबंन, गीतेश बेलेकर गणेशपूर, विवेक गोडे कोसारा, आशिष झाडे दृष्यांत काटकर, विजय भेदूरकार वैभव मोहितकर मार्कि, प्रणय काळे वेदड आदींचे सहकार्य राहणार आहे.
संभाजी ब्रिगेड झरी तालुक्याच्या वतीने ई-श्रमकार्ड शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 24, 2021
Rating:
