सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूरच्या वतीने दि. २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर पावेताे चंद्रपूर पंचायत समितीच्या परिसरात हरभरा भाजी, लाखोळी बटवा, मोहोरी मुळ्याची पाने, मेथी, पालक, तुळीच्या शेंगा, वटाण्याच्या शेंगा, मुळा, चियुर राजगिराची भाजी, लसणाची चोप, हिरवा पातीचा कांदा, काशी टमाटर, आप्पल बोर, अंगूर इत्यादी विविध प्रकारच्या ताज्या व हिरव्या पालेभाज्यांचे तीन दिवशीय प्रदर्शन व विक्री महोत्सव भरविण्यात आलेले आले असून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे आज या प्रदर्शन व विक्री केन्द्राला भेट दिली असता प्रत्यक्षात दिसून आले.
दरम्यान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर अंतर्गत कार्यरत सेंद्रिय शेती प्रभाग समन्वयक, समुदाय कृषी व्यवस्थापक, कृषी सखी च्या माध्यमातून गावांमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करीत असतात. हिवाळा ऋतूमध्ये गावामध्ये सहजरित्या उपलब्ध असणांऱ्या परंतु शहरात न मिळणाऱ्या सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या अनेक प्रकारचा भाजीपाला या विक्री प्रदर्शनचे मुख्य आकर्षण ठरले आहे. सदरहु भाजीपाला विक्री महोत्सवचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती केमा रायपूरे यांच्या शुभ हस्ते झाले असून पंचायत समितीचे उपसभापती विकास जुमनाके, पंचायत समितीचे सदस्य गजानन हटवार गट विकास अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारीगण या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते. या शिवाय जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूरचे गजानन ताजने, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंगचे रोशन साखरे, जिल्हा व्यवस्थापक नगराळे, जिल्हा व्यवस्थापक महेंद्र बंदुरकर आदींची उपस्थिती लाभली हाेती.
उपराेत्त कार्यक्रमाचे नियोजन तालुका अभियान व्यवस्थापक शितल देरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन प्रतिक्षा खाेब्रागडे तालुका व्यवस्थापक संस्था बांधणी व क्षमता बांधणीच्या जयश्री नागदेवते प्रभाग समन्वयक प्रविण फुके, भारत कळसकर समुदाय कृषी व्यवस्थापक साेनम जांभूळकर, कृषी सखी, समूह संशाधन व्यक्ती, समूहातील महिलांनी विशेष सहकार्य केले. सदरहु भाजीपाला महोत्सवला व विक्री केन्द्राला आज गुरुवारी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र वैद्य यांनी शुभेच्छा भेट देवून या उपक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.
या वेळी मूलचे यूवा नेते अशाेक मारगनवार प्रामुख्याने उपस्थित हाेते. आयोजित केलेला महाेत्सव खराेखरचं वाखाण्यजाेगा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी बाेलतांना दिली. अनेक ग्राहकांनी या प्रदर्शन विक्री केन्द्रातुन हिरव्या भाजीपाल्यांची खरेदी केल्याचे आयाेजकांनी या वेळी सांगितले.
थेट शेतातील हिरवा भाजीपाला चंद्रपूर पंचायत समितीच्या परिसरात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 23, 2021
Rating:
