निवडणूक धुराळा : पोट निवडणुकीत विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून केला आनंद व्यक्त

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

मारेगाव : मारेगाव तालुक्यातील नरसाळा ही पेसा ग्रामपंचायत आहेत. या ग्रामपंचायत मध्ये एकूण नव सदस्या ची समिती असून,मागील २०२१ च्या निवडणुकीत एक सदस्य दोन जागेवर निवडून आल्याने त्याला एका जागेचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या जागे करीता पोट निवडणूक घेण्यात आली. व त्या जागेवर आता झालेल्या निवडणुकीच्या निकालात सौ.प्रतिभा सुरेंद्र सोयाम ह्या विजयी झाल्यात. यांचा विजयाचा आनंद द्विगुणित करण्याकरीता गावाचे आराध्य दैवत महा बली हनुमानजी यांची पूजा अर्च्या करून विजयाची माळ गळ्यात टाकून उपस्थीत सर्वाना गुलाल लावून विजयी आनंद व्यक्त केला. शासनाच्या नियमाचे पालन करीत हा आनंद उत्सव अगदी साधा पद्धतीने साजरा झाला. या आनंद उत्सवाला गावातील मान्यवर श्री. वसुदेवजी देवाळकर, श्री. संजयजी भुसारी,श्री. गोविंदराव खंडरे,श्री.लहानुजी उईके, प्रवीण मत्ते,रामकृष्ण खंडरे, विश्वास सोयाम, सुनील सूर्तेकर, पंकज बोढे, धनंजय तोडासे, प्रदीप आत्राम, रामदासजी खाडे व इतर मान्यवर गावकरी उपस्थीत होते.
निवडणूक धुराळा : पोट निवडणुकीत विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून केला आनंद व्यक्त निवडणूक धुराळा : पोट निवडणुकीत विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून केला आनंद व्यक्त Reviewed by सह्याद्री चौफेर on December 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.