चंद्रपूर : एसडीओ राेहन घुगे यांची उल्लेखनीय कामगिरी - अवैध रेती तस्करांना दिला दणका !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे

चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील अवैध रेती तस्करांचे केन्द्र बनलेल्या स्थानिक पठाणपूरा भागातील मुख्य मार्गावर एकाच दिवशी तब्बल अवैध रेतींची वाहने येथील कर्तव्यदक्ष सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एसडीआे राेहन घुगे यांनी मंगळवार दि.२१डिसेंबरला जप्त केल्याचे खात्रीलायक वृत्त नुकतेच प्राप्त झाले आहे. या बाबत असे कळते, गेल्या काही दिवसांपासून पठाणपूरा भागातुन दिवस रात्र अवैध रेतीची वाहनाव्दारे वाहतुक सुरु हाेती मध्यंतरी एका मंडळ अधिका-याने व पटवा-याने या परिसरात जावून अवैध रेतीची वाहने पकडण्यांचा प्रयत्न केला दरम्यान एक वाहन त्यांचे हाती देखिल लागले. त्या नंतर रितसर दंडात्मक प्रक्रिया तहसील कार्यालया मार्फत सुरु झाली.परंतु याच भागातुन माेठ्या प्रमाणात रेतीची वाहतुक सुरु असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांना मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी घुगे यांनी मंगळवारी संध्याकाळी सात वाजता पठाणपुरा भागातील अवैध रेतीची तब्बल अकरा वाहने पकडुन जप्त केली व ते येथील तहसील कार्यालयात दंडात्मक कारवायांसाठी जमा केली. सदरहु अवैध रेतीची वाहतुक करतांना नेहमीच या भागातील रेती तस्कर ठिकठिकाणी पाळत ठेवणारी आपली माणसे ठेवतात पण काल या पाळत ठेवणा-यांना माणासांना देखिल झालेल्या या धडक कारवायांचा पत्ता लागला नाही हे विशेष! उल्लेखनीय बाब अशी या आधी सुध्दा चंद्रपूरचे कर्तव्यदक्ष सहाय्यक जिल्हाधिकारी राेहन घुगे यांनी घुग्घुस परिसरात एकाच दिवशी पहाटेला २६ अवैध रेतींची वाहने पकडली हाेती. मंगळवारी त्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवायांमुळे अवैध रेती तस्करांत चांगलीच खळबळ उडाली असून एसडीआे घुगे यांनी केलेल्या या कारवायांचे चंद्रपूरकरांनी स्वागत केले आहे.
चंद्रपूर : एसडीओ राेहन घुगे यांची उल्लेखनीय कामगिरी - अवैध रेती तस्करांना दिला दणका ! चंद्रपूर : एसडीओ राेहन घुगे यांची उल्लेखनीय कामगिरी - अवैध रेती तस्करांना दिला दणका ! Reviewed by सह्याद्री चौफेर on December 23, 2021 Rating: 5
Powered by Blogger.