अधिपरिचारीकांना पुनर्रनियुक्ती देण्यात यावी - सेवा संपुष्टात आलेल्या अधिपरिचारीकांची मागणी

सह्याद्री न्यूज : किरण घाटे 

चंद्रपूर : जगभर पसरलेल्या काेराेनाची झळ चंद्रपूर जिल्ह्याला देखिल पाेहचली हाेती. दिवसांगणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात तथा जिल्हा शासकीय रुग्णालयात कंत्राटी सबबीवर काही अधिपरिचारीकांची नियुक्ती करण्यांत आली हाेती. दरम्यान त्यांनी एक वर्ष तीन महिण्यांपासून स्वताच्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र इमाने इकबारे उपरोक्त ठिकाणी सेवा दिली .परंतु आता त्यांची सेवा संपुष्टात आणल्यामुळे त्यांच्या समाेर माेठा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.

पुढील तिस-या लाटेची (काेराेना) संभाव्य परिस्थिती लक्षात घेता परत त्यांना कामावर घेण्यांत यावे अशी मागणी संजीवनी गेडाम, दक्षता हनुमंते, सपना उमरे, मनिषा बारसागडे, अंजली रिंगणे, शिल्पा दुपारे, प्रदन्या गेडाम, करिष्मा वांढरे, सिता प्रसाद, प्रियंका मेश्राम, यांचे सह अनेकांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे कडे आज साेमवार दि.६ डिसेंबरला एका लेखी निवेदनातुन केली आहे. पुढील एक वर्षासाठी सर्व परिचारीकांना नियमीत करण्यांत यावे असे देखिल त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.
अधिपरिचारीकांना पुनर्रनियुक्ती देण्यात यावी - सेवा संपुष्टात आलेल्या अधिपरिचारीकांची मागणी अधिपरिचारीकांना पुनर्रनियुक्ती देण्यात यावी - सेवा संपुष्टात आलेल्या अधिपरिचारीकांची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on December 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.