टॉप बातम्या

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने बाबासाहेबांना वाहिली श्रध्दांजली !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
   
चंद्रपूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने श्रध्दांजली कार्यक्रम संपन्न झाला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वान दिनानिमित्त आज दिनांक ०६ डिसेंबर, २०२१ रोजी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने स्थानीय आंबेडकर चौक, चंद्रपूर येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात काँग्रेसचे युवा नेते राहूलबाबू पुगलिया यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी काँग्रेसचे युवा नेते राहूलबाबू पुगलिया यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहीली. या नंतर विदर्भ किसान मजदूर काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय. इंटक संघटना, कामगार संघटनेच्या वतीने पुष्पमाला अर्पित करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी युवा नेते राहुल पुगलिया आपल्या भाषणात म्हणाले की डॉ .बाबासाहेबांनी देशातील गोरगरीब, दलित, वंचितांच्या जीवनाच्या उध्दारासाठी फार मोलाचे योगदान दिले आहे. संविधाना सोबतच ग्रामस्तरांपासून तर देशस्तरांपर्यंत संविधानाच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबविण्याची प्रेरणा डॉ. बाबासाहेबांनी दिली, ते आदर्श व प्रेरणा आपण आपल्या हृदयात कायमची जोपासली पाहिजे ".
कार्यक्रमाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे महामंत्री अॅड अविनाश ठावरी, करणबाबू पुगलिया, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक देवेन्द्र बेले, महामंत्री तथा नगरसेवक अशोक नागापूरे, चंद्रपूर जिल्हा इंटकचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, अॅड विजयराव मोगरे, एन.एस.यू.आय. चे जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, नगरपरीषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण बुरडकर, माजी नगरसेवक महेन्द्र जयस्वाल, श्रीनिवास पारनंदी, युवक काँग्रेसचे स्नेहल चालूरकर, दुर्गेश चौबे, चेतन गेडाम, महेश माशीरकर, कामगार संघटनेचे विरेन्द्र आर्य, सुभाष माथनकर, गजानन दिवसे, अनिल तुंगीडवार, सुनिल बकाली, क्रिष्णा यादव, सुनिल बावणे, काँग्रेसचे सुधाकरसिंह गौर, बाबूलाल करुणाकर, रतन शिलावार, मुरलीधर चौधरी, पृथ्वी जंगम, सुनिल बोडणे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post Next Post