डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महापारिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. गजानन सोडनर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत असताना भारताच्या महासत्तेची स्वप्न दाखवून दिले असे आपले मत मांडले. सोबतच प्रा. भगत सर यांनी मुलींच्या शिक्षणाची तरतूद संविधानात करण्यात आली आहे असे पटवून देण्यात आले.

या प्रसंगी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे सरांनी प्रतिमेस पुष्पहार घालून महामानवास अभिवादन केले. सोबतच महाविद्यालयाचे अधीक्षक श्री रवींद्र धानोरकर, प्रा. प्रवीण कुलकर्णी, प्रा. चव्हाण सर, प्रा. राऊत सर, प्रा. चिरडे सर, प्रा. आत्राम सर, प्रा. जेणेकर सर, प्रा. कांबळे मॅडम, असुटकर सर, नितीनभाऊ, अभिजित पंढरपूरे व रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी बाळासाहेब देशमुख सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा. विजय भगत, प्रा. शेंडे मॅडम तसेच इतर शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी महामानवास अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन Reviewed by सह्याद्री चौफेर on December 06, 2021 Rating: 5
Powered by Blogger.