Top News

महामार्गवरील अपघातात एकाचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल

मारेगाव : तालुक्यातील वेगाव येथील दोन युवक मारेगाव वरून गावाच्या दिशेने परत निघाले असता, मारेगाव यवतमाळ हायवे रोड वरील महाविद्यालयासमोर अचानक म्हैस आडवी आल्याने दुचाकीस्वारचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू तर,एक गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना दि.25 डिसेंबर च्या सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान घडली.

संतोष प्रभाकर सुर (अंदाजे 23 वर्षे) रा. वेगाव असे मृतकाचे नाव आहे. तर गोलू टेकाम (हेटी पोड) हा गंभीर जखमी असून त्याला मारेगाव ग्रामीण येथील प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले.

सूत्राच्या माहितीनुसार संतोष आणि त्याचा मित्र गोलू टेकाम याला घेऊन मारेगाव वरून निघाला. मात्र, गावाकडे मद्य सेवन करून उतारासाठी पव्वेही सोबत घेतले व ते गावाकडे निघाले. अशातच महामार्गांवर म्हैस आडवी आली. त्यामुळे दुचाकीवरून नियंत्रण सुटले आणि डिव्हाडरला धडकले. परिणामी दुचाकीवरून खाली पडून संतोष चा मृत्यू झाला. त्यात त्याच्या पोटाच्या भागाला मद्य शिषा काचेच्या रुतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अशी चर्चा आहे.

घटनेचा अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


Previous Post Next Post