सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
मारेगाव (कोरंबी) येथे परिवरासह राहणारा संतोष वसंतराव काळे (35) हा 7 डिसेंबरला अचानक घरुन बेपत्ता झाला. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर 9 डिसेंबरला त्याचे वडिल वसंतराव गंगाधार काळे यांनी मुलगा बेपत्ता झल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. तेंव्हा पासुन पोलिस त्याचा शोध घेत होते. दरम्यान आज कोरंबी येथिल जनता शाळेजवळील झुडपात त्याचा मृतदेहच आढळूनआला. त्यामूळे पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. त्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला, हे आद्यापही गुलदसत्यात आहे. त्याच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्याचा पोलिस प्रयत्न करित आहे.
पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपिआय माया चाटसे करित आहे.
बेपत्ता इसमाचा आढळला मृतदेह, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2021
Rating:
