टॉप बातम्या

म्हाडा परीक्षा पुढे ढकलल्या बाबत- भारतीय जनता युवा माेर्चाच्या वतीने महाविकास आघाडीचा चंद्रपूरात निषेध

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : एका पाठाेपाठ परीक्षा रद्द करण्यांचा धडाका लावणां-या महाविकास आघाडीचा काल सोमवार दि.१३ डिसेंबरला येथील स्थानिक गांधी चाैकात चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध करण्यांत आला.

आराेग्य भरतीतील सावळा गाेंधळ, पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतांनाच हाेवू घातलेली म्हाडा परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थांत नाराजीचे सुर उमटले आहे.दरम्यान काल मध्यरात्री ग्रूह मंत्री जितेन्द्र आव्हाड यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्यांची घोषणा केली आहे. नाेकरीचे भावी स्वप्न बघणा-या युवक युवतींनी सदरहु परीक्षेची तयारी करुन ठेवली हाेती परंतु ऐन वेळी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे त्यांचेत असंतोष निर्माण झाल्याचे काल दिसून आले.

महा विकास आघाडीचा निषेध करतांना भारतीय जनता युवा माेर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख़्येने हातात निषेध फलक घेवून आज उपस्थित हाेते.
Previous Post Next Post