सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
मोहर्ली ते विरकुंड मार्गावरील जंगल परिसरात कोंबड बाजार भरविला जात असल्याची गुप्त माहिती पोलिस स्टेशनला मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी कुणाला जराही सुगावा न लागू देता जंगल परिसरात जाऊन शोध घेतला असता त्याठिकाणी काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा जुगार खेळतांना आढळून आले. कोंबड्याच्या झुंजीवर पैशाचा खेळ खेळणाऱ्या तिन आरोपींना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून झुंज लावणारे दोन कोंबडे व दोन लोखंडी धारदार कांती पोलिसांनी जप्त केल्या. घटनास्थळावरून तीन दुचाक्या, तीन मोबाईल हँडसेट व जुगार खेळ्णाऱ्यांजवळ असलेली २२८० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ३३ हजार ७८० रुपयांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. आरोपी जगदीश गुरुचरण पाटील (३८) रा. राजूर कॉलरी, विठ्ठल लटारी पिंपळशेंडे (५८) रा. नायगांव, विजय मधुकर फटाले (३८) रा. पटवारी कॉलनी लालगुडा यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर म.जु.का. च्या कलम १२(ब), १२(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या आदेशावरून पोउपनि शिवाजी टिपूर्णे, परि.पोउपनि आशिष झिमटे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, हरिन्द्रकुमार भारती, विशाल गेडाम, शंकर चौधरी, अमोल नुनेलवार यांनी केली.
जंगल परिसरात सुरु असलेल्या कोंबड बाजारावर पोलिसांची धाड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2021
Rating:
