"त्या" चाैकाला बिरसा मुंडा चौक म्हणुन मान्यता द्या-आदिवासी एकता युवा परिषदचे गडचिराेली नगर परिषदेला निवेदन


सह्याद्री न्यूज : किरण घाटे 

चंद्रपूर : गेल्या १४ वर्षांपासून शासकीय विज्ञान महाविद्यालय चामोर्शी रोड गडचिरोली जवळच्या चौकात जननायक बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येते. इतकेच नाही तर, बिरसा मुंडा चौक म्हणुन त्या ठिकाणी फलक देखील लावण्यात आला आहे. तेव्हा पासून दरवर्षी या ठिकाणी छोटखानीे कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत येते.

यावर्षी बिरसा मुंडा जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज एकत्र येऊन कार्यक्रमात सहभागी झाला हाेता. कार्यक्रमाला खासदार अशोक नेते व माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांनी भेट दिली. उपराेक्त चाैकाला बिरसा मुंडा चाैक अशी नगरपरिषदेची मान्यता देण्यात यावी या करीता गडचिराेलीच्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांना आदिवासी एकता युवा परिषद गडचिरोलीच्या वतीने नुकतेच एक निवेदन देण्यात आले.

सदरहु निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते सुखदेव वेठे, माजी जिल्हा परिषद सदस्या कुसुमताई अलाम प्रतिभाताई चौधरी, मुकुंद मेश्राम, संजय उईके, प्रदीप कुलसंगे, सुधीर मसराम व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
"त्या" चाैकाला बिरसा मुंडा चौक म्हणुन मान्यता द्या-आदिवासी एकता युवा परिषदचे गडचिराेली नगर परिषदेला निवेदन "त्या" चाैकाला बिरसा मुंडा चौक म्हणुन मान्यता द्या-आदिवासी एकता युवा परिषदचे गडचिराेली नगर परिषदेला निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on December 12, 2021 Rating: 5
Powered by Blogger.