सह्याद्री न्यूज नेटवर्क |
कळंब : कळंब तालुक्यातील दैनिक लोकदूत तालुक प्रतिनिधी तथा राष्ट्रीय क्रांतीकारी महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांची भारतीय मानवधिकार परिषद (PSP) यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.
जिल्हा अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल रुस्तम शेख यांनी भारतीय मानवधिकार परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र सिंह वालीया, प्रदेश अध्यक्ष वाल्मीक केदारे, सुरेश कोट, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष (हनिफ) राजू शेख, यांचे आभार व्यक्त केले.
भारतीय मानवधिकार परिषद च्या माध्यमातून समाजातील अन्यायग्रस्त, उपेक्षित घटकाला न्याय देण्या करिता सदैव प्रामाणिक प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष रुस्तम शेख यांनी "सह्याद्री न्यूज"शी बोलतांना व्यक्त केली.
भारतीय मानवधिकार परिषद जिल्हाध्यक्ष पदी रूस्तम शेख यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2021
Rating:
