सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
यवतमाळ : स्थानीय लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालयाच्या गृहअर्थशास्त्र विभागातर्फे कमवा आणि शिका उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी पुष्परचना, सजावट आणि सादरीकरण या विषयावर प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर दुर्गेश कुंटे यांनी गृह अर्थशास्त्र विषयाची उपयुक्तता स्पष्ट करताना पुष्परचना व सजावट विद्यार्थिनींना रोजगार सक्षम बनवू शकतो असे मत व्यक्त केले. भारतीय संस्कृतीतील ललितकला आणि पुष्परचना यांच्यातील सहसंबंध परिभाषित करतांना त्यांनी पुष्प रचनेचे नवनवीन प्रकार विद्यार्थीनींनी शिकून आपल्या सुप्त कलागुणांना संधी द्यावी असे आवाहन केले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ सरिता देशमुख यांनी पुष्प कला व मानवी जीवन यावर प्रकाश टाकला. द्वितीय सत्रात डॉ मनीषा शिरसागर यांनी कचर्यातून कला आणि पुष्परचना याचे प्रात्यक्षिक दाखविले.
कार्यशाळे करिता इतिहास विभाग प्रमुख प्रा.कविता तातेड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. स्वयंरोजगारा करिता अशा प्रकारच्या कार्यशाळा उपयोगी असल्याने विद्यार्थिनींनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या पुष्प रचनेचे सादरीकरण आणि विक्री करण्याची योजना असल्याचे मत प्रा. रुद्राणी पांडे याप्रसंगी व्यक्त केले. समारोपीय समारंभात विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करताना व्यवहारिक ज्ञान देणाऱ्या कार्यशाळा उपयोगी असून गृह अर्थशास्त्र विषय दैनंदिन व्यवहारात अनुभव देणारे असल्याचे सांगितले. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता डॉ सरिता देशमुख, प्रा रुद्राणी पांडे, डॉ मनीषा शिरसागर यांनी प्रयत्न केले.
पुष्परचना कला प्रशिक्षणातून स्वयम रोजगार प्राप्ती शक्य - प्राचार्य डॉ. कुंटे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 13, 2021
Rating:
