सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्यातील आैद्याेगिक नगरी म्हणून आेळखल्या जाणा-या बल्लारपूर शहरात स्थानिक पाेलिस स्टेशनच्या पाेलिसांनी एका बनावट विवाह लावून देणा-या टाेळीला नुकतेच गजाआड केले आहे.
येथील पाेलिस स्टेशनच्या हद्दी अंतर्गत विसापूर समिप भिवकुंड हे गांव आहे. त्या गावात एका युवकाचा विवाह हाेता. त्याच ठिकाणी एका घरगुती भांडणाची ठिणगी पडली.अन् त्या नंतर या बनावट विवाह नाट्याचा पडदा उघडला गेला.पाेलिसांनी अधिक व सखाेल चाैकशी नंतर बनावट वधूसह तात्पुरते (बनावट) बनलेल्या सर्व पाहुण्यांना अर्थात आराेपींना पाेलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.घटनास्थळावरुन बनावट वधूने पळून जाण्याचा आटाेकाट प्रयत्न केला परंतु ती त्यात यशस्वी हाेवू शकली नाही. बल्लारपूर पाेलिसांनी आराेपींच्या विराेधात भांदविच्या कलम ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पाेलिस पथक अधिक चाैकशी करीत आहे.
पाेलिसांच्या कामगिरीचे केले काैतुक व अभिनंदन ! बल्हापूर पाेलिस स्टेशनचे पाेलिस निरीक्षक उमेश पाटील व त्यांचे पथकांने माेठ्या शिताफीने बनावट लग्न लावणा-या टाेळीस माेठ्या शिताफीने जेरबंद केल्या बद्दल चंद्रपूरच्या राजीव गांधी नगर येथील वैशाली मेश्राम, गाैरी माेहुर्ले, छाया कन्नाके, प्रतिमा ठवरे, पिंकी विश्वास, छाया बाेरकर व मडावी यांनी त्यांचे काैतुक व अभिनंदन केले आहे .
बनावट विवाह लावणारी टाेळी गजाआड !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 01, 2021
Rating:
