सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : आज बुधवार 1 डिसेंबरला सकाळी घुग्घुस परिसरात असलेल्या चिचोली येथील रेती घाटावर चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राेहन घुगे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुसचे मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी शैलेश दुव्वावार, राहुल भोंगळे, रवी तल्लार, यांनी धाड टाकून तीन (अवैध रेतीचे तस्करी करणारे) ट्रॅक्टर जप्त केली. त्या नंतर सदरहु जप्त केलेली वाहने येथील तलाठी कार्यालयात दंडात्मक कारवायांसाठी जमा करण्यांत आल्याचे वृत्त आहे.
या बाबत असे कळते की, घुग्घुस परिसरातील चिचोली रेती घाटावर एमएच 34 एल 3562, एमएच 34 एल 3598, एमएच 34 एल 7193 नबी भाई, अशोक घोडके, विलास रामटेके यांच्या मालकीचे तीन ट्रॅक्टर अवैध रेती तस्करी करण्यासाठी चिचोली रेती घाटावर गेले हाेते महसूल विभागाने संयुक्तरित्या धाड टाकून तीन ट्रॅक्टर जप्त करून तलाठी कार्यालयात लावले. या वेळी घटनास्थळावरुन एकूण 3 ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त करण्यात आला. प्रत्येकी एका ट्रॅक्टर धारकांकडून 1 लाख 10 हजार 900 रुपये प्रमाणे 3 लाख 32 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी नवले यांनी दिली.
गत तीन ते चार वर्षांपासून घुग्घुस परिसतील रेती घाटाचा लिलाव झाला नाही. त्यामुळे या परिसरातील अवैध रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घालून ट्रॅक्टर व ट्रालीने अवैध रेती तस्करी दिवस रात्र करणे सुरु केले हाेते. आजच्या या महसुल विभागाच्या धडक कारवायामुळे रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
चंद्रपूर महसूल विभाग पथकाच्या कारवाया - अवैध रेतीचे वाहने केले जप्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 01, 2021
Rating:
