सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावातील मुळ रहिवासी सुनील गेडाम हे तहसील कार्यालयात शेतीच्या फेरफार करण्यासाठी वारंवार फे-या मारून वैतागून गेले होते.त्यांना तुमची शेती शासन जमा करू अश्या धमक्या देखिल मिळत होत्या. मात्र, ह्या पोकळ्या धमक्यांना न जुमानता त्यांनी हा वारंवार अधिकाऱ्यांसोबत घडतं असलेला हा प्रकार ऑल इंडिया पँथर सेनेकडे कथन केला. ऑल इंडिया पँथर सेनेने त्यांना न्याय मिळेपर्यंत लढावं असं ठमकावून सांगितलं. ऑल इंडिया पँथर सेना ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी असेल. तेव्हा सुनील गेडाम यांनी उपोषणाचा स्वतःहून मार्ग अवलंबला व त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक २४ नोव्हेंबर पासून उपाेषणाला सुरूवात केली. त्यांच्या मागण्या जोमाने धरून ऑल इंडिया पँथर सेना दिवस रात्र सोबतीने राहत होती. अखेर दिनांक १ डिसेंबर २०२१ ला त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले. त्यामध्ये रुपेश निमसरकार जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना,उपाध्यक्ष त्यागीभाई देठेकर, युवाध्यक्ष अजयभाऊ झलके, जिल्हा सल्लागार संतोषजी डांगे यांचे विशेष सहकार्य मोलाचे योगदान आहे. या शिवाय सिंदेवाही तालुकाध्यक्ष आक्रोश खोब्रागडे, तालुका युवाध्यक्ष तथागत कोवले, उपाध्यक्ष जितेंद्र नागदेवते, महेंद्र कोवले, उपकार खोब्रागडे तथा ऑल इंडिया पँथर सेनाच्या पदाधिकारी व सदस्यांचे सुद्धा विशेष सहकार्य लाभले असल्याचे रुपेश निमसरकार यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आज चंद्रपूर मुक्कामी सांगितले.
सुनील गेडामच्या बेमुदत उपोषणाला आले यश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 01, 2021
Rating:
